तब्बल सात महिन्यानंतर रेल्वे धावणार, आरक्षित प्रवाशांनाच मुभा
प्रतिनिधी / मिरज
तब्बल सात महिने बंद असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेस, आणि कोयना एक्सप्रेस या गाडय़ा रविवारी 11 ऑक्टोबरपासून रुळावर येत आहेत. तशी घोषणा मध्यरेल्वे प्रशासनाने केली आहे. या विशेष गाडय़ा सुरू झाल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. केवळ आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशांनाच या रेल्वे गाडय़ातून प्रवास करण्यास मुभा आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेली सात महिने बंद असलेल्या रेल्वेसेवा हळूहळू सुरू करण्यात येत असून, पाच एक्सप्रेस रेल्वे गाडय़ांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस, नागपूर एक्प्रेस, दुरांतो एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस या पाच गाडय़ांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारने एक ऑक्टोंबरपासून अनलॉकची नवी नियमावली जाहीर केली. त्यामुळे राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. येत्या रविवारी 11 ऑक्टोंबरपासून कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू होत आहे. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस ही गाडी 12 ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरहून सुटणार आहे. तर मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी कोयना एक्सप्रेस ही 13 तारखेला मुंबईहून सुटणार आहे. या दोन्ही गाडय़ांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच आहे. मात्र, सदर गाडय़ा कर्जत, खंडाळा, घोरपडी, तारगांव, ताकारी आणि वळीवडे या स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यानंतर कोल्हापूर-गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी रविवारी निर्धारीत वेळेत धावणार आहे. याही गाडीला सेवाग्राम, चंदूर, जालंब, पुणतांबा, जरंडेश्वर, तारगांव, मसूर, भवानीनगर, ताकारी, वळीवडे हे थांबे नसणार आहेत. या गाडय़ांचे तिकिट आरक्षण शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या गाडय़ा सुरू झाल्याने पुणे ते कोल्हापूर या मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
महालक्ष्मी, सह्याद्री 16 पासून धावणार
मध्य रेल्वेने टप्प्याटप्प्याने रेल्वे गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, 16 तारेखपासून महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. पुणे-कोल्हापूर पॅसेंजर आणि कोल्हापूर-पुणे पॅसेंजर गाडय़ाही लवकरच सुरू होणार आहेत. यामुळे मिरज रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची गजबज पुन्हा पहावयास मिळणार आहे. तब्बल सात महिन्यानंतर या गाडय़ा रुळावर येत आहेत.
Trending
- उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करुन जेजुरीकरांना न्याय मिळवून देऊ, राज ठाकरेंचे आश्वासन
- रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती
- काँग्रेस नगरसेवकाने केला हवेत गोळीबार,सांगलीत खळबळ
- Ratnagiri : कस्टमने जप्त केलेल्या 1 हजार 800 शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू
- …अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल
- गॅरंटी योजनांचा विकासावर परिणाम होणार नाही – मंत्री सतीश जारकीहोळी
- परिखपुल प्रश्नी रेल्वे,महापालिकेला नोटीस
- अजित पवारांबद्दल जे बोललो त्याबद्दल खेद वाटतो, राऊतांची नरमाईची भूमिका