ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले, अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून, विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी 18 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांना थोडा ताप आणि कणकण जाणवत असल्याने त्यांनी स्वतः ची कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांची टेस्ट निगेटिव आली होती. मात्र, त्यानंतर अजित पवार यांना ताप जाणवत असल्याने पुन्हा एकदा चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव आले आहेत.
दरम्यान, माझी प्रकृती उत्तम असून थोड्याच दिवसात विश्रांतीनंतर सेवेत रुजू होईन, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.