ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात राज्यात 5 हजार 560 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 6 हजार 944 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 163 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 66 हजार 620 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.82 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,01,16,137 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,69,002 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,01,366 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,676 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 64 हजार 570 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- पुणे शहरात 259 नवे रुग्ण
काल पुणे शहरात 259 नवे रुग्ण आढळून आले तर 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवशी 12 जणांचा मृत्यू झाला. सध्या 204 रुग्ण क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्य स्थितीत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या 4 लाख 89 हजार 506 वर पोहोचली असून त्यातील 4,78,629 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2,049 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8,828 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.