ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासात 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 16,379 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 261 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,71,28,093 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,63,880 (15. 79 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 61 हजार 864 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : रुग्ण दुप्पटीचा काळ 553 दिवस

मुंबईत मागील 24 तासात 788 नवे रुग्ण आढळून आले. तर 551 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,13,790 वर पोहचली असून त्यातील 6,80,520 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,100 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 15,947 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.