- राज्य सरकारकडून अनलॉक-5 ची नियमावली जाहीर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास राज्य सरकारने अखेर आज परवानगी दिली आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.

त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यासोबतच पुणे विभागातील लोकल सुरू होणार आहेत. तसेच मुंबईतील डबेवाल्यांनी लोकल मधून प्रवास करता यावा अशी विनंती सरकारकडे केली होती. ती सरकारने मान्य केली असून डबेवाल्यांनाही दिलासा दिला आहे. यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड दिला जाणार आहे.
- कन्टोनमेंट क्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन
दुसरीकडे, कन्टोनमेंट क्षेत्रात मात्र 31 ऑक्टोबर पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये हे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.