- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.6 टक्क्यांवर !
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ उतरता असून कालही नवीन बाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आली आहे. मागील 24 तासात 51 हजार 457 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 34,031 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.

दरम्यान, कालच्या दिवशी 594 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 67 हजार 537 वर पोहचली आहे. यातील 49 लाख 78 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 84 हजार 371 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.6 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.54 % इतके आहे.
सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 01 हजार 695 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक जास्त म्हणजेच 67 हजार 295 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबईत ही संख्या 29,445 इतकी आहे. तर ठाणे जिल्ह्यात 28 हजार 383 आणि नागपूरमध्ये 23,272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.