ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखाच्या पुढे गेली आहे. मागील चोवीस तासात राज्यात 3 हजार 493 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यांतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 1 हजार 141 इतका झाला आहे.
यातच दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 718 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. आता पर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कालच्या एका दिवसात 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात मृतांचा एकूण आकडा 3717 इतका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण रुग्ण संख्येपैकी एकट्या मुंबईत रुग्णांचे प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 55 हजार 451 असून यामध्ये 28, 248 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर 25,125 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 2 हजार 44 जणांनी आपला जीव गमावला आहे.
तसेच महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.3 टक्के तर मृत्यूदर 3.7 टक्के इतका आहे. तर आता पर्यंत 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात पाच लाख 79 हजार 569 लॉक होम क्वारंटाइन आहेत, तर 28 हजार 200 लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.