ऑनलाईन टीम / मुंबई :
गुरुवारी महाराष्ट्रात 5,902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 66 हजार 668 वर पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 7,883 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत 14,94,809 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.69 % इतके आहे. राज्यात 1 लाख 27 हजार 603 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
गुरुवारी 156 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात मंडळ निहाय मृत्यू संख्येत ठाणे मंडळ 56, नाशिक मंडळ 7, पुणे मंडळ 39, कोल्हापूर मंडळ 11, औरंगाबाद मंडळ 7, लातूर मंडळ 12, अकोला मंडळ 7, तर नागपूर मंडळातील 17 जणांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यू दराचे प्रमाण 2.16 % इतके आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 88,37,133 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,66,668 (18.86टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,33,687 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.