ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. गुरूवारी राज्यात राज्यात 12 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आहे. त्या तुलनेने शुक्रवारी कोरोना बधितांच्या संख्येत किंचित घट झालेली दिसून येत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या अधिक आली आहे. राज्यात मागील 24 तासात 11 हजार 766 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 8,104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील बाधितांची संख्या 58 लाख 87 हजार 853 वर पोहोचली असून त्यातील 56 लाख 16 हजार 857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81 टक्के एवढा आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,61,704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- मुंबई : 15,819 रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईत मागील 24 तासात 696 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 658 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 24 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,15,146 वर पोहचली असून त्यातील 6,81,946 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,146 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 598 दिवस इतका आहे.