- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 %
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 52 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.76 % आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,628 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 38 हजार 630 वर पोहचली आहे. सध्या 33 हजार 936 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 255 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.52 % आहे.
- मुंबईत 415 नवे रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 415 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 302 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,11,012 वर पोहचली आहे. तर 2,93,118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 04 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,382 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 597 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.