मुंबई आणि रायगड मधून माती गटात निवड

वार्ताहर / औंध
राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खटाव तालुक्यातील आणखी दोन मल्लांची माती गटातून निवड झाली आहे. नांदोशी ता खटाव येथील मनोज आण्णा कदम 92 किलो वजनगटातून मुंबई उपगरचे प्रतिनिधित्व करणार आहे तो भोसले व्यायाम शाळा सांगली येथे प्रशिक्षक संभाजी सावर्डेकर शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तसेच जायगांव ता.खटाव येथील ऋषिकेश दिलीप देशमुख रायगड जिह्यातून 97 किलो गटात आखाडय़ात उतरणार आहे. तो भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे मारुती आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. निवड झालेल्या मल्लांचे कुस्तीशौकिनी कौतुक केले आहे.