प्रतिनिधी/कडेगाव
महाराष्ट्रात सातत्याने महिलांवर होत असलेले अत्याचार व बलात्काराच्या निषेधार्थ अभाविप कडेगाव शाखेच्या वतीने कडेगाव बस स्टँड परिसरात घडलेल्या घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अत्याचार पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निषेधानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
मागील काही दिवसांपासून महिलावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी व मन सुन्न करणाऱ्या या घटना आहे. साकीनाका (मुंबई) परिसरातील बलात्कार पीडित निर्भयाची उपचारादरम्यान मृत्यूशी अखेर झुंज संपली. राज्य शासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलवावीत व हा खटला जलद न्यायालयात चालविण्यात येऊन संबंधित सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून श्रद्धांजली अर्पण करत असताना पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना अटक केली.
या ज्वलंत घटनेवर शांत असणारे सरकार, जे लोक या घटनेला वाचा फोडण्याचे काम करत आहे त्यांचेच तोंड दाबण्याचे काम करत आहेत, असे प्रतिपादन करत आंदोलकांनी राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी जिल्हा संयोजक अजय मोहिते, तालुका प्रमुख गिरीधर सुतार, तालुका सहप्रमुख दिग्विजय देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleमोटारसायकली चोरणाऱया युवकाला अटक
Next Article गणेशोत्सवानिमित्त सांगलीत पोलिसांचे संचलन
Related Posts
Add A Comment