ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आज जागतिक महिला दिनानिमित्त आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे सोपवले आहे. त्यानुसार स्नेहा मोहन दास यांनी ट्विटरवर @narendramodi या हँडलवरून सर्वपथम ट्विट केले आहे. आपण फूड बँकेच्या संस्थापक असल्याची माहिती त्यांनी या ट्विट द्वारे दिली आहे.
स्नेहा म्हणाल्या की, त्यांनी चेन्नईत महापूर येण्यापूर्वी 2015 मध्ये फूड बँकेची स्थापना केली होती. भूकेविरूद्ध लढा देणे आणि कोणीही भुकेला राहू नये हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. फूड बँक उघडण्याची प्रेरणा कोठून मिळाली हेही त्यांनी सांगितले.
स्नेहा यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, फेसबुकवर लोकांशी संपर्क साधून ती फूड बँकेसाठी काम करते. त्यांनी फूड बँक – चेन्नई नावाचे एक फेसबुक पेज तयार केले आणि लोकांना आपापल्या राज्ये, शहरांच्या नावावर फेसबुक पेज तयार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनावर, भारतात अशा 18 ठिकाणी आणि दक्षिण आफ्रिकेत फूड बँक सुरू झाल्या. फूड बँक स्वयंसेवक लोकांकडून जेवणासाठी कच्चा माल लोकांकडून घेतात आणि मग जेवण बनवून गरिबांमध्ये वाटतात.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.