प्रतिनिधी / असळज
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम सुरु होताना शेतकऱ्यांना सर्व निविष्टा त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत मिळण्याच्या दृष्टीने पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी गगनबावडा यांच्या मार्गदर्शनाखाली खेरीवडे येथील भरारी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.खेरीवडे येथील भरारी महिला बचत गटाकडे गावातील शेतकर्यानी नोंदणी करून त्यांना आवश्यक असणाऱ्या खाते व बियाणे यांची मागणी केली.त्यानुसार पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी एम.एच.दाभाडे व तालुका कृषी अधिकारी जी.ए.खाडे यांनी कृषी सेवा केंद्र व शेतकरी यांचेत समन्वय साधून शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांना हुमणी किडीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी एम.एच.दाभाडे, शिवाजी गायकवाड, तसेच कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक एस.डी.पाटील ,एम.टी.नलवडे,कृषी सहाय्यक व्ही.एम.जाधव,व्ही.पी.शिरगावकर,श्रीमती के.जे.कांबळे,बाबासो पाटील,बी.एम.विचारे व भरारी महिला बचत गट अध्यक्षा मंगल दळवी, सर्व सदस्य तसचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.