कोडोलीत यशस्वी दिपावली महोत्सवाचे उद्घघाटन
वारणानगर / प्रतिनिधी
महिलांच्या विकासासाठी योजना राबवू असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कोडोली ता. पन्हाळा येथील यशस्वी दिपावली महोत्सवाचे उद्घघाटन प्रसंगी केले.
कोडोलीतील दत्त मठी समोरील क्रिडागंणावर यशस्वी फौंडेशनच्या माध्यमातून दोन दिवसीय भरवण्यात आलेल्या दिपावली महोत्सवाचे उद्घाटन तसेच पन्हाळा बावड्याचे माजी आ.स्व.यशवंत ए. पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक स्व. प्रदीप पाटील यांच्या प्रतिमाचे पूजन, तसेच महोत्सवातील प्रायोजकांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी फौंडेशनमार्फत महिलांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करू, माजी आ.स्व. यशवंत ए. पाटील यांच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याला उजाळा देत त्याचे कार्य नातू डॉ. जयंत पुढे नेत आहे त्याला सर्वांनी सहकार्य करा मी देखील त्यांच्या पाठीशी आहे. असे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी या प्रसंगी सांगीतले.
यावेळी डॉ. जयंत पाटील फौडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत इंगवले यानी महोत्सवाचा उद्देश तसेच यामध्ये विविध प्रकारचे असलेले स्टॉल याचा प्रास्ताविकात अढावा घेतला. यावेळी यशवंत शिक्षण समूहाच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील,सचिव डॉ. जयंत पाटील,फौडेशनच्या उपाध्यक्षा वैशाली पोवार, एैश्वर्या पवार- पाटील,प्राचार्य डॉ मिलींद गोडबोले,डॉ सुर्यकिरण वाघ, डॉ. संतोष पायघन, डॉ प्राचार्या ग्रेस गायकवाड यांचे सह मान्यवर उपस्थित होते.