कुर्डुवाडी प्रतिनिधी
फिर्यादी पीडित महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत तुझ्या भावाला जिवंत मारतो अशी धमकी देत फिर्यादीवर जबरदस्तीने दुष्कर्म करून इतर दोघांनी फिर्यादीच्या व तिच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले. तसेच फिर्यादीच्या घरावरील वैरण, घरातील सामान व कपडे पेटवून दिले ही घटना दि.९ रोजी कुर्डू ता.माढा येथे घडली.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन रंनजीत सिंनगारे ,अविनाश शिंदे, रमेश बोराटे सर्व रा. कुर्डुवाडी,ता.माढा या तिघांविरोधात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे करीत आहेत.