प्रतिनिधी / बेळगाव
फोंडा (गोवा) येथील फोंडा एज्युकेशन सोसायटी संचालित राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक मांगिरीश नरेंद देशपांडे यांना आर. के. युनिव्हर्सिटी-राजकोट (गुजरात) या विद्यापीठाने फार्मसी (फार्माकोलोजी) या क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
मांगिरीश देशपांडे यांनी ‘फायटोफारमाकोलोजिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ फायल्यांटस युरिनारिया ऍण्ड एडियांटम लुनुलाटम ईन पेप्टिक अल्सर डिसीस’ हा शोधप्रबंध सादर केला होता. त्यांनी पीएचडी दरम्यान 3 शोधनिबंध प्रकाशित केले व 3 आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध सादर केले. त्यांना एपीटीआय-जयपूर येथे उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले. त्यांना प्राध्यापक डॉ. निलम बालेकर, आय. पी. एस. अकॅडमी इंदोर यांचे मार्गदर्शन लाभले. देशपांडे यांच्या यशाबद्दल फोंडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवि सी. नाईक (माजी मुख्यमंत्री-गोवा), संस्थेचे सचिव रितेश नाईक व प्राचार्य डॉ. मामले देसाई यांनी अभिनंदन केले.