वार्ताहर/ कारदगा
मांगूर येथील एका 22 वषीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी आला. त्यामुळे परिसरामध्ये घबराट पसरली आहे. सदर माहिती मिळताच ग्राम पंचायतीचे पिडीओ संतोष कमते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका, पोलीस, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांनी सदर महिलेचे घर सीलडाऊन केले आहे.
मांगूर येथील सहा गरोदर महिलांचा बेनाडी येथील आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेण्यात आला होता. त्यातील एका 22 वषीय महिलेचा अहवाल सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा मांगूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सदर महिला बेनाडी येथील प्राथमिक केंद्रामध्ये असून पुढील उपचारासाठी तिला कोविड केअर सेंटरला पाठविण्यात येणार आहे. शिवाय तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.