अयोध्येतील महंत परमहंस दास यांचे पत्र
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी स्वतःच्या जन्मदिनी इच्छामरण देण्याची मागणी केली आहे. 7 मागण्या पूर्ण न झाल्यास इच्छामरणाची अनुमती द्या, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर त्यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख केला आहे.
तत्पूर्वी 12 ऑक्टोबर रोजीही महंत परमहंस दास यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रशासनाने बळजबरीने त्यांचे उपोषण समाप्त करविले होते. महंत परमहंस दास यांनी राम मंदिर उभारणीसाठीही उपोषण केलेले आहे.
पत्रातील 7 मागण्या
लोकसंख्या नियंत्रण कायदा
समान नागरिकत्वाचा कायदा
भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा
मुलींना मोफत शिक्षण द्या
गोवंशाला राष्ट्रीय वारसा घोषित करा
रामचरित मानसला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा
बेरोजगाराला पात्रतेनुसार नोकरी द्या