प्रियांका चोप्राने काढले उद्गार
अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्वतःचा देश भारतासाठीचे प्रेम व्यक्त करण्याची कुठलीच संधी गमावत नाही. दिवाळी असो किंवा करवा चौथ ती भारतीय संस्कृतीला मनापासून आत्मसात करते. हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणाऱया देसी गर्लने अलिकडेच दर मॅट्रिक्स रिसरेक्शन्सच्या प्रमोशनदरम्यान भारताबद्दल उद्गार काढले आहेत.
मला माझे मूळ माहित आहे आणि मला कधीच घरापासून दूर असल्याची जाणीव होत नाही. मला तुम्ही भारताबाहेर नेऊ शकता पण माझ्या मनातील भारताला कधीच दूर करू शकत नाही. माझी संस्कृती नेहमीच माझ्यासोबत सावलीप्रमाणे चालते. याचमुळे मला कधीच घरापासून दूर राहण्याची जाणीव होत नाही. माझे घर, माझे मंदिर, आई आणि लोणचे नेहमी माझ्यासोबत असते असे तिने म्हटले आहे. विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. न्यूयॉर्कमधील तिचे भारतीय खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट देखील लोकप्रिय ठरले आहे.