कुर्डुवाडी / प्रतिनिधी
माढा तालुक्यात आज नव्याने एकूण ५४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ३४७ झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
कुर्डुवाडी शहरात आज तिघाजणांचा अहवाल कोरोनाबाधित येताच त्यांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची अँन्टीजेन टेस्ट घेण्यात आली यामधून एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. तसेच एका खासगी हाॅस्पीटल मधील दोन परिचारिकांचा ही स्वॅबचा अहवाल आज पाॅझिटीव्ह आला आहे .
शहरात टेंभुर्णी रोड परिसरात एकूण ५ जण, रेल्वे कॉलनी देवकते वस्ती व पटेल चौक येथे प्रत्येकी १ जण, माढारोड परिसरातील ९ अशा एकूण १६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष अडागळे यांनी सांगितले. तसेच तालुक्यात उपळाई बु,माढा, मोडनिंब, अकोले बु, भीमानगर, निंमगाव टें, येथे पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील तर काही नव्या लोकांची रॅपीड टेस्ट घेतली असता उपळाई बु येथे तब्बल २३, माढा येथे ५, मोडनिंब येथे ७, अकोले बु येथे १,भीमानगर येथे १,निंमगांव टें १ असे कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात कुर्डुवाडी, उपळाई बु,माढा येथील वाढता बाधितांचा आकडा हा चिंताजनक आहे. लोकांनी आपली खरी माहिती प्रशासनाला देऊन वेळीच उपचार घेतले तर यावर नियंत्रण आणणे प्रशासनाला शक्य होईल . तरी नागरिकांना याबाबत काही लक्षण दिसताच ताबडतोब दवाखान्यात जाऊन तपासणी करावी यामुळे शंकेचे समाधान ही होईल आणि पुढे होणारा प्रादुर्भाव ही रोखता येईल .सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
Previous Articleऐतिहासिक पायाभरणी
Next Article प्रिंदावणमध्ये झाड कोसळून महिला ठार
Related Posts
Add A Comment