नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट यांनी तेलंगणात सर्वात मोठे डाटा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तेलंगणा राज्य सरकारबरोबर कंपनी चर्चा करत असल्याचे समजते. सदरच्या केंद्रात अंदाजे 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. जर का चर्चा यशस्वी झाली तर अमेरिकेबाहेर केली जाणारी ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तेलंगणाचे आयटी आणि उद्योग मंत्री के. टी. रामाराव यांनी काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या वरिष्ठांशी यासंदर्भातच चर्चा केली होती, असे समजते.
Trending
- Sangli Breaking : तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून.
- 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
- माणसातला देवमाणूस ! डॉ . ज्ञानेश्वर दुर्भाटकर
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !