वार्ताहर/ काकती
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा संचालक मंडळाच्यावतीने शुक्रवारी पार पडला.
येत्या गळीत हंगामाकरिता कारखान्याची यंत्रसामग्री सुसज्ज झाली आहे. सकाळी होमहवन करून विधीवत पुजा करण्यात आली आहे. यावर्षी तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे अधिक उद्दीष्ट संचालक मंडळाने ठरविले आहे. गेल्या वर्षी ट्रायल झाली होती. साखरेचा उतारा देखील चांगला होता, असे कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन तानाजी पाटील, कार्यकारी संचालक एम. डी. मल्लूर, संचालक मनोहर हुक्केरीकर, सुमित पिंगट, बसवराज घाणगेर, संचालिका निलिमा पावशे, वसुंधा म्हाळोजी, भाऊराव पाटील, भरत शानभाग, सद्याप्पा राजकट्टी, लक्ष्मण नाईक, परशराम कोलकार, मॅनेजर कमलाकर बेंद्रे कर्मचारीवर्ग उपस्थित होता.