प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील मालगांव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत बावाफन उरुसावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यावर्षीचा उरुस रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मालगांव ग्रामपंचायतीने केली आहे. ग्रामस्थ, दर्गा ट्रस्टी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. केवळ मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.