मालवण/प्रतिनिधी:-
मालवण:येथील शासकीय ठेकेदार नामदेव हरीभाऊ मोहिते (वय 70)यांचे सोमवारी ( ता.10)सायंकाळी कुडाळ येथील राहात्या घरी निधन झाले.
1सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1975 च्या सुमारास पुरेशा पायाभूत सुविधा नसतांना त्यांनी शासकीय ठेकेदार म्हणून कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील मालवण, कुडाळसह विविध तालुक्यातील रस्ते,बंधारे, पूल यांची कामे त्यांनी केली. कुडाळ नेरुरपार पूलांच्या बांधकामात त्यांचा सहभाग होता. शांत, सुस्वभावी व्यक्तीमत्त्व म्हणून ते परिचीत होते. 2005 पयँत ते बांधकाम व्यवसायात सक्रिय होते. सुरुवातीला वायरी आणि नंतर टोपीवाला हायस्कूल परिसरात ते राहात. त्यांच्या मागे मुलगा गिरीश, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.मुंबई सकाळचे प्रतिनिधी महेंद्र पवार यांचे ते मामा होत.