प्रतिनिधी / मालवण:
मालवण बाजारपेठ येथील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रातदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा केला. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मालवण नगराध्यक्ष माहेश कंदळगावकर , नगरसेविका आकांशा शिरपुटे , माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर , माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर , रोटरी क्लब अध्यक्ष ऊमेश सांगोडकर , अमेय देसाई , रतन पांगे , गुरुनाथ नाईक , चाचा हडकर , राजेश कोवळे , सुहास ओरसकर , संजय गावडे, अभय कवटकर , मंदार ओरसकर , ऍड. ऋषिकेश खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.