प्रतिनिधी /बेळगाव
माहेश्वरी अंधमुलांच्या शाळेमध्ये विस्तारा फौंडेशनतर्फे परीक्षेची भीती व ताण यापासून दूर कसे रहावे, याबद्दल कार्यशाळा घेण्यात आली. बेंगळूर निम्हान्स येथील सुनील हे वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त कसे रहावे व स्मरणशक्ती कशी वाढवावी, याचे मार्गदर्शन केले.
यावेळी फौंडेशनच्या अध्यक्षा सुजाता दोडमनी, राजनंदा गारगी, आरती अंगडी, कीर्ती रजपूत यांनी शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी युवा स्पंदनच्या मेघना तसेच विद्यार्थी मोहम्मद पिरजादे, अक्षता सगटी यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक दोडमनी यांनी आपले मत नोंदविले. सूत्रसंचालन स्मिता मिटगार यांनी केले. अनिता गावडे यांनी आभार मानले. याप्रसंगी कार्यवाह प्रभाकर नागरमुनवळ्ळी, विस्ताराच्या चिन्मयी प्रवीण, प्रदीप बनंदूर उपस्थित होते.