बेळगाव / प्रतिनिधी
माहेश्वरी सखी मंडळाचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच माहेश्वरी भवन येथे पार पडला. यावेळी मंडळाच्या मोजक्मयाच सदस्या उपस्थित होत्या. मंडळाने माहेश्वरी समाजाच्या स्त्री उद्योजकांची माहिती असलेल्या तसेच मंडळाच्या उपक्रमांची माहिती असलेल्या सखी या पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी नूतन संचालक मंडळाकडे मावळत्या संचालक मंडळाने अधिकार सुपूर्द केले. नूतन संचालक मंडळामध्ये मनीषा मालू, सुमन हेडा, शीतल हेडा, मंगल सारडा, संगीता, माहेश्वरी, सुलोचना हेडा यांचा समावेश आहे. मावळते संचालक मंडळातील मंगल सारडा, प्रीती चिंडक, अनिता माहेश्वरी, सुलोचना हेडा यांनी नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अमृता बजाज यांनी केले. प्रीती चिंडक यांनी आभार मानले.