ख्वाजा वस्ती येथे चोरट्यांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली
प्रतिनिधी/मिरज
शहरातील ख्वाजा वसाहतीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जानीब हुसेन मुल्ला यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील तिजोरीत ठेवलेले सहा तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार, 500 रुपयांची रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
ख्वाजा वसाहत येथे चोरट्यांनी आणखी दोन घरे फोडण्याचा प्रयत्न केला. जानीब मुल्ला यांच्या घराचे कुलूप तोडून आतील तिजोरी फोडली. सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कचरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. भरवस्तीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके तैनात- वीरकर
ख्वाजा वस्तीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दागिने आणि रोकड लंपास केले आहे. श्वान पथक आणि ठसे तज्ञांमार्फत चोरीचा माग काढला जात आहे. या चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण, आणि शहर पोलीस असे दोन पथक तैनात केले आहेत. रेकॉर्ड वरील चोरट्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली.
Previous Articleममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; ‘या’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
Related Posts
Add A Comment