प्रतिनिधी / मिरज
कोरोनाचा प्रसार आता शहरातील सर्वच भागात झाला आहे. सामान्य नागरिकांबरोबर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, हॉटेल व्यवसायिक, व्यापारी याचबरोबर राजकीय कार्यकर्त्यांनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनामुळे शनिवारी एका राजकीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. दिंडीवेसमधील अन्य एका रुग्णाचाही कोरोनाने बळी गेला. यामुळे गेल्या महिन्याभरात शहरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 11 वर पोहचली आहे. शनिवारी नवे 14 रुग्ण आढळून आले आहेत.
शनिवारीही शहरात 14 रुग्ण आढळून आले. यामध्ये दिंडीवेस, न्यू इंग्लिश स्कुल, कुरणे गल्ली, बेथेलहेमनगर, कृष्णाघाट, समतानगर, मालगांव रोड, मुजावर गल्ली येथे हे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांबरोबरच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱया व्यक्तींची संख्याही वाढत आहे. शनिवारी एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा कोरोनाने मृत्यू झाला. तर दिंडीवेस भागातील एका रुग्ण कोरोनाने दगावला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात शहरात कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱया कोरोना रुग्णांमुळे शहरात भितीचे वातावरण आहे.