रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब, उदय सामंत, सतेज पाटील यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीमधील मिऱया सागरी बंधाऱयाचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आभासी प्रणालीद्वारे भूमिपूजन सोहळा पार पडणार आह़े आज रविवारी सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम भाटीमिऱया आंब्रेवाडी येथील प्राथमिक शाळेत पार पडेल़ यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत़ मंत्र्यांचा गोतावळा रत्नागिरीत जमणार असल्याने प्रशासनाचीही लगबग पहावयास मिळत आह़े
समुद्राच्या लाटांमुळे मिऱया (मोर टेंबे) ते पांढरा समुद्र या बंधाऱयाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असत़े यामुळे किनाऱयाशेजारी असणाऱया घरांनाही धोका निर्माण झाला होत़ा या बाबींचा विचार करून मिऱया ते पांढरा समुद्र या सागरी किनाऱयावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली होत़ी त्यानुसार राज्य शासनाने या बंधाऱयासाठी सुमारे 169 कोटींचा निधी मंजूर केल़ा या कामाचे भूमिपूजन 26 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आह़े यावेळी ठाकरे हे आभासी प्रणालीने उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथून खासगी हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे येणार आहेत़ तर मिऱया बंधाऱयाचे उद्घाटन आटपून सायंकाळी 5.25 वा. मुंबईकडे प्रयाण करतील़ तर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे मांडवी एक्सप्रेस गाडीने दुपारी दीड वाजता रत्नागिरी येथे येतील़ मिऱया येथील कार्यक्रम आटपून सायंकाळी 5.25 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबई येथे रवाना होतील़ तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे चिपी विमानतळ सिंधुदुर्ग या ठिकाणाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रत्नागिरी विमानतळ येथे येतील आणि मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजेरी लावतील़ यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे वाढदिवस अभीष्टचिंतन कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहतील़ तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दुपारी 3 वाजता विमानाने रत्नागिरी विमानतळावर येतील़ मिऱया येथील कार्यक्रम आटपून सतेज पाटील हे सायं. 5 वाजता विमानाने प्रयाण करतील़
मिऱया धूपप्रतिबंधक बंधारा भूमिपूजन सोहळ्य़ाला आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, शेखर निकम, खासदार विनायक राऊत, ज़ि प अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी ब़ी एन पाटील, ज़ि प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग तसेच पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आह़े