पणजीः भाजप आमदार मिलिंद नाईक यांच्या ’सेक्स स्क?डल’च्या मुद्यावरून गुन्हे शाखा आपल्याला प्न्हा पुन्हा बोलावून त्रास देत असल्याचा आरोप मुरगाव येथील काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी मंगळवारी केला.
आमोणकर यांना मंगळवारी गुन्हे शाखेत बोलावण्यात आले आणि नंतर त्यांना पणजीतील महिला पोलिस स्थानकात नेण्यात आले आणि नंतर महिला पोलिसांकडे दिलेले मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले.
एका महिलेने आपल्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलीस आपला छळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. “या महिलेने बिहारमध्ये तक्रार केली होती. ही तक्रार मुरगाव पोलीस स्थानकात आणि नंतर गुन्हे शाखेत हस्तांतर करण्यात आली होती. तिच्या तक्रारी वरून पोलिसांनी माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला, परंतु मी 35 दिवसांपूर्वी महिला पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवर अद्याप मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.” असे आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले.
“मी भाजपच्या दबावाच्या डावपेचांना घाबरत नाही. त्यांनी मला अटकर सुद्धा केले तर मी त्यांना घाबरत नाही. मी यापुढेही सत्यासाठी लढणार आहे आणि मिलिंद नाईक यांच्या विरोधात सर्व पुरावे माझ्याकडे असल्याने सत्याचाच विजय होईल असा मला विश्वास आहे. आमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांसह आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहोत.” असे आमोणकार म्हणाले.