नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लसीकरणाची मोहीम देखील सुरू आहे. आशातच भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी भोपाळमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी गोमुत्राचा अर्क घेतल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही व मला कोरोनाही झाला नाही, असे वक्तव्य केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तसेच सर्व लोकांनी स्वदेशी गायीचं पालन केलं पाहिजे, असा सल्ला देखील खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाले की, काही लोक मी गायब असल्याचं सांगत माझ्यावर बक्षिस घोषित करण्याच्या वार्ता करत आहेत. अशी लोकं सवैधानिक गुन्हा करत आहेत. त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम देवाचं आहे. मी माझ्या बंगल्यातूनच लोकांची मदत करत आहे. माझे सहकारीदेखील काम करत आहेत. केवळ आम्ही त्याचा प्रचार केला नाही. म्हणूनच मी गायब असल्याचं म्हणत आहेत.
यासोबतच प्रत्येक व्यक्तीनं पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे. असं केल्यास अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Article‘स्पुतनिक-व्ही’ उतरली मैदानात!
Next Article कोयना नदीत सापडले तीन ग्रॅनाईट बॉम्ब; जिल्ह्यात खळबळ
Related Posts
Add A Comment