प्रतिनिधी/वाई
कोरोनाचे संकट वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघावर आले. संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीला धावून जाताना कुठेही आमदार म्हणून कमी न पडलेले आमदार मकरंद आबा यांनी पायाला भिंगरी लावली होती. सततच्या लोक संपर्कात असल्याने त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करताच आमदार मकरंद पाटील यांनी ही ट्विटद्वारे धन्यवाद आमदार रोहित राजेंद्र पवार जी. तुमच्या सदिच्छा व सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाच्या जोरावर मी लवकरचं बरा होईन व मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी दाखल होईन, अशी भावनिक साद केली आहे.
आमदार मकरंद पाटील हे आणि वाई -खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातल्या जनतेचे घट्ट नाते आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमदार मकरंद आबा म्हणून प्रतिमा आहे. महाबळेश्वरच्या घनदाट जंगलातील गाढवली भागापासून, वाईच्या जांभळी खोऱ्यापर्यत, वाईच्या उडतारे भागापासून ते खंडाळाच्या निरेच्या तीरापर्यत आमदार मकरंद आबा यांचे लक्ष असते. कोरोनाच्या संकट आले तेव्हापासून आपल्या मतदार संघातली जनता सुखी राहिली पाहिजे, त्यांना आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत राहिले. ज्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेथे जाऊन ते तेथील जनतेला आधार देत होते. अशा आबांनाच कोरोनाने गाठले.
त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे निकटवर्तीयांनी सांगितले. जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याबाबत ट्विट केले होते.कोरोनावर मात करून लोकांची सेवा करण्यासाठी लवकर बरे व्हा माझ्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत असे ट्विट केले.
त्यावर आमदार मकरंद पाटील यांनी रोहित पवार यांना ट्विटद्वारे धन्यवाद आमदार रोहित राजेंद्र पवार जी. तुमच्या सदिच्छा व सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाच्या जोरावर मी लवकरचं बरा होईन व मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी दाखल होईन “., अशी भावनिक साद दिली आहे.
Previous Articleसोलापूर शहरात ७०, ग्रामीणमध्ये ३४० नवे रुग्ण
Next Article चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण
Related Posts
Add A Comment