एस. मुलानीचे सामन्यात 11 बळी, कोटीयानची प्रभावी गोलंदाजी
वृत्तसंस्था /मुंबई
2022 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील झालेल्या सामन्यात गुरुवारी मुंबईने हैदराबादचा 1 डाव आणि 217 धावांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात 6 बाद 651 धावावर आपला डाव घोषित केला होता. कर्णधार अजिंक्य रहाणेने शानदार द्विशतक तर यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांनी दमदार शतके झळकवली. रहाणेने 261 चेंडूत 3 षटकार आणि 26 चौकारासह 204, जैस्वालने 1 षटकार आणि 27 चौकारासह 162, सर्फराज खानने 18 चौकारासह नाबाद 126 धावा झळकवल्या. मुलानीने 4 चौकारासह 23 धावा केल्या. पृथ्वी शॉ 19 धावावर बाद झाला. हैदराबादच्या काकने 3 तर शशांकने 2 गडी बाद केले.
हैदराबादचा पहिला डाव 65.1 षटकात 214 धावावर आटोपला. हैदराबादच्या डावात रोहित रायडूने एकाकी लढत 9 चौकारासह 77 तर कर्णधार अगरवालने 5 चौकारासह 40, राहुल बुद्धीने 4 चौकारासह 18 धावा केल्या. मुंबईचा मुलानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 94 धावात 7 तर कोटीयानने 60 धावात 2 आणि तुषार देशपांडेने एक गडी बाद केला. हैदराबादने 6 बाद 173 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला गुरुवारी पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 47 धावात बाद झाले. मुंबईने हैदराबादला फॉलोऑन दिला. हैदराबादने दुसऱया डावात 67.2 षटकात 220 धावापर्यंत मजल मारली.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई प. डाव 127.2 षटकात 6 बाद 652 डाव घोषित (रहाणे 204, जैस्वाल 162, सर्फराज खान नाबाद 126, काक 3-106, शशांक 2-107, त्यागराजन 1-198), हैदराबाद प. डाव 65.1 षटकात सर्वबाद 214 (रोहित रायडू 77, अगरवाल 40, बुद्धी 18, त्यागराज 14, काक 13, मुलानी 7-94, कोटीयान 2-60), हैदराबाद दु. डाव 67.2 षटकात सर्व बाद 220 (बुद्धी 65, अगरवाल 39, रेड्डी 23, तेजा 10, त्यागराज नाबाद 39, शशांक 13, मुलानी 4-82, कोटीयान 5-82, अवस्थी 1-25).