ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांची व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातच आज विक्रोळीतील एका प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित डॉक्टर 59 वर्षीय असून त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांची कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटिव आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
संबधित डॉक्टरचे विक्रोळी भागात क्लिनिक होते. त्यांचा सामाजिक क्षेत्रात सहभाग असल्याने त्यांच्या मृत्युनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पार्थिवावर मुंबई महापालिकेच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.