संगमेश्वर/प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीक पारेख पंपाजवळआज शुक्रवारी सकाळी सात वाजता साईसृष्टी या खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. या बसमध्ये २५ प्रवासी होते व ही बस मुंबईहून कणकवलीकडे जात होती. आग लागल्याचे कळताच सावधानता बाळगून सर्व प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली.