प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज वाढदिवस असला तरी ते साजरा करणार नाहीत. तसेच आज त्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेतलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आज जनतेला भेटणार नाहीत. तसेच त्यांना कोणीही भेटण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जनतेला केले आहे. कोरोना महामारीचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जनतेने मुख्यमंत्र्यांना भेटू नये, असे कळकळीचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.