प्रतिनिधी /बेळगाव
जी. बी. जोशी मेमोरियल ट्रस्ट धारवाड, क्षमता हुबळी आणि स्वर मल्हार फौंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 7 रोजी ख्यातनाम गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदवाडी येथील आयएमईआर कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला इन्फोसिस, एलआयसी ऑफ इंडिया आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. मुग्धा यांना सारंग कुलकर्णी आणि श्रीधर मांढरे अनुक्रमे संवादिनी आणि तबला संगत करणार असून मैफल सर्व रसिकांना खुली असल्याचे कळविण्यात आले आहे.