मारिहाळ पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
मुचंडी (ता. बेळगाव) येथे एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली असून त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महेश यल्लाप्पा यल्लारी (वय 25, रा. नेताजी गल्ली, मुचंडी) असे त्याचे नाव आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्या जवळून 2 हजार 10 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या महेशची चौकशी केली असता त्याने आपण शास्त्राrनगर येथील बुकी विजय शंकर जागृत याच्याकडे चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे बुकीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.