- डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सध्या 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अजूनही लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच आता लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एक चांगली माहिती मिळत आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे ( एम्स ) निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, देशातील मुलांसाठी भारत बायोटेक कंपनीकडून कोरोना लसीची चाचणी करण्याचे काम सुरू आहे.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, सध्या भारत बायोटेक कंपनीकडून मुलांसाठी बनवल्या जात असलेल्या लसींची चाचणी सुरू आहे. या चाचणीचा निकाल सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या भारतातील 42 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण युवा वर्गाचे लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. त्यानंतर आता मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.