केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रस्तावाला अनुमती, हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मकता दर्शवली आहे. या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्मयता आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आले. मुलींच्या विवाहासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच त्यात बदल होऊ शकतो.
मुलींचे लग्नाचे किमान वय लवकरच 18 वरून 21 वर्षे करण्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. यासंबंधीचे विधेयक चालू अधिवेशनातच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा झाली.
मागील वर्षी या मुद्यावर स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाने आपल्या अहवालात लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली होती. या कृतीदलाने महिलांविषयक इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी सरकारला सुचविल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वषी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, सध्याची परिस्थिती लक्षात घेता विवाहाचे वय वाढवण्याच्या शक्मयतेचा विचार करणार असल्याची घोषणा केली होती.
यापूर्वी 1978 मध्ये विवाह कायद्यात दुरुस्ती
टास्क फोर्सने लग्नाचे वय 21 वर्षे ठेवण्यासाठी चार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. मुलींच्या किमान वयात शेवटचा बदल 1978 मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार ‘शारदा कायदा 1929’मध्ये बदल करून वय 15 वरून 18 वर्षे करण्यात आले होते.
देशात दरवर्षी 18 ते 21 वयोगटातील 16 कोटी मुलींचे विवाह
भारतात दरवषी 18 वर्षांहून कमी वय असताना विवाह करणाऱया मुलींचा आकडा 15 लाख इतका असल्याचा दावा ‘युनिसेफ’ने केला आहे. तसेच जनगणना विभागाच्या रजिस्ट्रार जनरलनुसार, देशात 18 ते 21 वयोगटातील विवाहित मुलींची संख्या सुमारे 16 कोटी इतकी आहे.