हुतात्मा मेजर उन्नीकृष्णन यांचा बायोपिक
दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबू याचा चित्रपट ‘मेजर’ घोषणेपासूनच चर्चेत आहे. बुधवारी आता याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. निर्माता महेश बाबूने स्वतःच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
व्हिडिओत अदिवी शेष हे मेजर उन्नीकृष्णन यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येतो. 75 ठिकाणी 8 सेट्सवर 120 दिवसांचे चित्रिकरण पूर्ण करण्यात आले आहे. हा चित्रपट तेलगूसोबत हिंदी आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट 26/11 मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक आहे. अभिनेता अदिवी शेष त्यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटात मेजर आणि ईशा यांची प्रेमकहाणी देखील दर्शविण्यात येईल. चित्रपटात अभिनेत्री सई मांजरेकर, सोभिता धुलिपाला, प्रकाश राज हे कलाकार देखील दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन सशी किरण टिक्का करत आहेत. तर सोनी पिक्चर फिल्म्स इंडियासोबत मिळून जीएमबी एंटरटेनमेंट अँड ए प्लस यस मुव्हीजकडून याची निर्मिती करण्यात आली आहे.