ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय माजी मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद सागर आणि पिडीपी चे ज्येष्ठ नेते सरताज मदनी यांच्याही नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली गेली आहे.
जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर मेहबूबा मुफ्ती 5 ऑगस्ट पासून नजरकैदेत ठेवले होते त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची नजरकैद आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, मुफ्ती यांच्या नजरकैदेत वाढ केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओरम अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नजरकैदेत वाढ करणे हा एक क्रूर निर्णय आहे. केंद्र सरकारने मुफ्ती यांच्या सोबत चुकीचे कृत्य केले आहे.
मेहबूबा मुफ्ती आणि अन्य लोकांनी अशा प्रकारचे कोणतेही व्यकतव्य केले नाही असं त्यांनी म्हटले आहे. मुफ्ती यांच्या नजरकैदेत वाढ करणे याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला 10 वर्ष मागे ढकलल्या सारखा होतो असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.