प्रतिनिधी/ सातारा
sदिल,दोस्ती, दुनियादारी, आमची आहे अनोखी यारी..प्रेंडशीप डेच्या खूप खूप शुभेच्छा भावा, अशा एकमेकांना शुभेच्छा देत सकाळपासून दिवसभर मैत्रीदिन सातारा शहर व परिसरात साजरा करण्यात आला. शहरातील कॅफेमध्ये मैत्री दिनाच्या निमित्ताने तुडूंब गर्दी पहायला मिळत होती. कास, ठोसेघर, उरमोडी, भांबवली या येथेही मैत्रीदिन काही मंडळींनी साजरा केला. मैत्रीदिनानिमित्ताने काहींनी प्रेंडशीप बेल्ट बांधून शुभेच्छा देत साजरा करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवडय़ातील रविवार म्हणजे मैत्रीदिन साजरा करण्याची प्रथा अलिकडच्या काही वर्षात सुरु झालेली आहे. साताऱयातही मैत्री दिन साजरा करण्याची प्रथा रुजू लागली आहे. मैत्रीदिनानिमित्ताने रविवारी सकाळपासूनच काही ग्रुपनी कास पठार, ठेसेघर धबधबा, उरमोडी धरण, भांबवली धबधबा येथे मैत्री दिन साजरा करण्याचे नियोजन केल्याने त्यांच्या वाहनांची गर्दी दिसत होती. त्यात पावसाची साथ असल्याने त्या मैत्रीदिनाला आणखी रंग भरला होता. काहींनी रस्त्यात मध्येच गाडय़ा लावून डान्स करत मैत्री दिन साजरा केला. मैत्रीदिनाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी काही कॉलेज कुमार आर्वजुन ज्यादा तासाचा बहाणा करुन साताऱयात आले होते. शहरातील बहुतांशी सर्वच कॅफे फुल दिसत होते.
वृक्षारोपण करुन केला मैत्री दिन साजरा
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, एस.के.इंडस्ट्रीज आणि वेदांता गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्रीदिनानिमित्ताने वृक्षारोपण आंबाणी गावच्या परिसरातील गोशाळा नजिक करण्यात आले. भर पावसात अजय पवार, शैलेंद्र सावंत, अक्षय बाबर, रविंद्र गाडे, शैलेंद्र बोर्डे, अनिल ढेब, आनंदा पोतेकर, कांबळे, भोसले, शिंदे, स्वरुप घाडगे, ताज, शेलार आदी सदस्यांनी आपल्या दिव्यांग गाडीवरुन झाडे घेवून कास पठारावर असलेल्या आंबाणी गावाजवळील गोशाळेच्या परिसरात नारळ, लिंबू, आंबा या झाडांचे रोपण करण्यात आले. झाडे वाचवा झाडे लावा हा संदेश देवून मैत्री दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत संस्थेच्यावतीने आपला निर्सग जपूयात, अशी मैत्री दिनाची शपथ घेवून मैत्री दिन साजरा करण्यात आला.