अभिनेता रणवीर सिंहचा आगामी ‘83’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘83’ चित्रपटावर दुबईमधील एका व्यक्तीने कट रचून फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये 83 चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दीपिका पदुकोणवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये दीपिका शिवाय साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांचे देखील नाव आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की हैदराबादमध्ये चित्रपटाशी संबंधीत काही बोलणे झाले होते. तसेच विब्री मीडियाशी चित्रपटाच्या इनवेस्टमेंट विषयी देखील बोलणे झाले होते. जवळपास 16 कोटी रुपये यामध्ये त्या व्यक्तीने गुंतवले होते. पण निर्मात्यांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती न देता या सर्वातून काढल्यामुळे तक्रार केली. आम्ही आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण निर्मात्यांना म्हणणे ऐकण्यात रस नसल्यामुळे आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. यावर निर्माते विष्णू वर्धन इंदुरी म्हणाले, ‘तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तक्रारकर्त्याला आधीच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर, त्याच्याशी संबंधित कमर्शिअल ऍक्टिव्हिटीवर प्रभाव टाकण्यापासून रोखले आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयातील खटला तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे.
Previous Articleहिवाळी अधिवेशनातील गैरहजेरी चिंतेची
Next Article सन्मार्ग टाकूनि भले न जाती
Related Posts
Add A Comment