20 मोटारसायकली जप्त : पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
मोटारसायकल चोरणाऱया दोघा अट्टल चोरटय़ांना गोकाक शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 9 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 20 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल राठोड व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून गोकाक नाक्मयाजवळ स्कुटीवरुन संशयास्पदरित्या फिरणाऱया दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी 20 मोटार सायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांनी दिली.