प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळावर जी एम आर कंपनीचे आर व्ही.शेषन यांच्या विरोधात मगोचे कार्यकर्ते आणि माजी सरपंच रुपेश परब यांनी दिली.या विषयी मगो तर्फे मगो कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी माहिती दिली. यावेळी मगोचे उमेदवार राजन कोरगावकर, माजी सरपंच शशिकांत महाले, शैलेश सावंत व इतर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश परब यांनी सांगितले की भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत कंपनीत कामगारासोबत बैठक आयोजित करण्यासाठी कंपनीचे अधिकारी आर व्ही. शेषन आणि पुढाकार घेवून राजकारण करण्याबरोबरच पक्ष पाती धोरण अवलंबल्याने निषेधकरतो असे सांगितले .
या कंपनींत जे पेडणे मतदार संघाचे मतदार कामाला आहेत त्या सर्वाना या बैठकीत कंपनीने बोलावले व भाजपलाच मते द्या.असे सांगतृ असून त्याचे पुरवा पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. हा प्रकार निंदनीय असून तो त्वरित थांबवून निवडणूक आयोगने याची गंभीर दखल घेवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी रुपेश परब यांनी बोलताना मोपा विमानतळावर एक व्यवस्थापक अभियंते म्हणून जागा होती, त्या जागेवर कंपनीने मये येथील एका भाजपच्या राजकीय पुतण्याला नोकरी दिली, या नोकरीसाठी पेडणे तालुक्मयाचा एकही युवक लायक नव्हता का असा सवाल रुपेश परब यांनी उपस्थित केला.
माजी सरपंच शशिकांत महाले यांनी बोलताना भाजपने सध्या दिलेला उमेदवार हा कमी शिक्षित आहे, आणि तो विमानतळावर जावून कामगारासोबत बैठका घेवून त्याना धमकावण्याचा प्रकार करत असल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करत असून हा प्रकार कादापही सहन करणार नाही, असे सांगितले .
मगोचे उमेदवार राजन कोरगावकर यांनी बोलताना भाजपचा उमेदवार मोपा विमानतळ परिसरात प्रचारासाठी धमकावण्यासाठी कसे जावू शकतात, त्या कंपनीने त्यांची व त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची कोरोना नकारात्मक सर्टिफिकेट तपासली का, त्याची चोकशी सरकारने करावी अशी मागणी कोरगावकर यांनी केली आहे.
कोरोना प्रमाणपत्र नसताना त्याना प्रवेश कसा दिला त्याची सरकारने चौकशी करून कारवाई करावी, या पुढे असला प्रकार घडणार नाही, आम्ही सर्व पेडणेकर संघटीत झाले आहोत. कामगाराना धमक्मया देण्याऱयाचे षडय़?त्र भाजपा करत आहेत.या पुढे पेडणेकरणा नोकऱयापासून वंचित ठेवले तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा कोरगावकर यांनी दिला.
मगो तक्रार करणारः राजन कोरगावकर
मगोचे उमेदवार राजन कोरगावकर यांनी बोलताना या कंपनीच्या अधिकाऱयाविरोधात केंद्र सरकार, पंतप्रधान , विमानतळ प्राधिकरण यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
स्थानिकाना कमी पगार
या कंपनीनी जे स्थानिक युवक काम करतात त्याना 15 ते 18 हजार पगार तर बाहेरच्या कर्मचारी यांना 25 ते 28 हजार पगार आहे. एकाच कामासाठी देतात हा प्रकार कसा काय असा सवाल उपस्थित केला.