क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
मोरजी वॅटरन्स संघाचा 2-1 गोलफरकाने पराभव करून साई वॅटरन्स संघाने धर्मापूर वॅटरन्सने आयोजित केलेल्या सेंट जोसेफ वॅटरन्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेचे आयोजन धर्मापूर मैदानावर करण्यात येत आहे.
बिबियान फर्नांडिसने केलेल्या फ्रिकीकवरील गोलने लढतीच्या 10व्या मिनिटाला साई वॅटरन्सने आघाडी घेतली होती. त्यानंतर 35व्या मिनिटाला नॅवील आरावझोने दुसरा गोल करून आघाडी दोन गोलानी वाढविली. मोरजी वॅटरन्सचा एकमेव गोल 40व्या मिनिटाला आंतोनियो डिसिल्वाने केला.