प्रतिनिधी / शिरोळ
बेकायदेशीर पानमसाला व तंबाखू पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी मौजे आगर (ता शिरोळ )येथील लियाकत बाबासो गवंडी वय 37 याच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याच्याकडून 41 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ – जयसिंगपूर मार्गावरील आगर फाटा कमानीजवळ लियाकत गवंडी याच्याजवळ विमल पान मसाला लिहिलेले पाऊच, स्टार पान मसाला व एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, बुधवारी दुपारी अडीच वाजन्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली, याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक सरनाईक यांनी दिली आहे.
Trending
- लग्नसोहळा असलेल्या घरातून दागिन्यांची चोरी
- पावसाची अद्याप दडीच
- दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर, ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी 12 जणांची चौकशी
- साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्यावर काँग्रेसने केला घोटाळ्याचा आरोप
- विद्यालये गजबजली, मुले उकाड्याने हैराण!
- माझी वसुंधरा अभियानात ‘कराड’ राज्यात पहिले
- सुट्टीचा अखेरच्या रविवारी पालक व मुलांचीही विविध ठिकाणी धमाल
- कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण